राजकीय

भाजप उमेदवार संगीता दुधाळ व अर्जुन मल्लाळे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद


भाजप उमेदवार संगीता दुधाळ व अर्जुन मल्लाळे यांचा मतदारसंघात  जोरदार प्रचार

 

विकासाला साथ द्या – आमदार समाधान आवताडे यांचे आवाहन

मंगळवेढा : प्रतिनिधी

हुलजंती जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार सौ. संगीता हनुमंत दुधाळ तसेच हुलजंती पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार अर्जुन मल्लाळे यांच्या प्रचारार्थ आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघातील विविध गावांमध्ये प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. या प्रचार सभांना नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून भाजपच्या विकासात्मक विचारांना जनतेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने या दोन्ही उमेदवारांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत मतदारांशी थेट संवाद साधला आहे. भाजप व मित्रपक्षांचे कार्यकर्ते जोमाने प्रचारात सहभागी होत असून “भाजपला मत म्हणजे विकासाला मत” या भावनेतून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मतदारसंघात विकासाची घडी बसवण्यासाठी या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार नागरिक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, प्रचाराच्या माध्यमातून आमदार समाधान आवताडे यांचा गावभेट दौरा सुरू असून प्रत्येक गावात त्यांचे व उमेदवारांचे नागरिकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. भाजपच्या माध्यमातून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यात आला असून हीच विकासाची घडी पुढे नेण्यासाठी नागरिकांनी विकासाला साथ द्यावी, असे आवाहन आमदार आवताडे यांनी केले.
संगीता  (आक्का)दुधाळ व अर्जुन मल्लाळे हे दोन्ही उमेदवार सक्षम, कार्यक्षम व जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले असून त्यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघाचा विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वासही आमदार समाधान आवताडे यांनी यावेळी व्यक्त केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *