उद्योगमहाराष्ट्रशहरसामाजिक

‘लेगसी उमंग २०२६’ला सोसायटीधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


लेगसी ग्रुपचा फाउंडेशन डे उत्साहात साजरा

‘लेगसी उमंग २०२६’ला सोसायटीधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी : प्रतिनिधी

पुणे ,पिंपरी चिंचवड परिसरातील विविध भागांत दर्जेदार, आरामदायी आणि आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त गृहप्रकल्प साकारत बांधकाम क्षेत्रात विश्वासाचे स्थान निर्माण केलेल्या लेगसी ग्रुपचा १९ वा फाउंडेशन डे नुकताच विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

या निमित्ताने बालेवाडी येथील द ऑचिड हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘लेगसी उमंग २०२६’ या विशेष कार्यक्रमाला लेगसीच्या सोसायट्यांमधील रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

लेगसी ग्रुपच्या कुटुंबीयांसाठी आयोजित या स्नेहमेळाव्यात हजारो नागरिक सहभागी झाले. रहिवाशांना आपल्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, तसेच लेगसी परिवारातील आपलेपणा आणि संवाद अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
रहिवाशांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत विविध कलागुण सादर करत कार्यक्रमात रंगत आणली.
या कार्यक्रमास लेगसी ग्रुपचे संचालक नरेश वासवानी, जगदीश चंदनानी, रोशन रमनानी, संचालिका निक्की वासवानी यांच्यासह लेगसी ग्रुपचे सभासद, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने रहिवासी उपस्थित होते.

यावेळी लेगसी ग्रुपच्या संचालकांनी सांगितले की,

“लेगसी परिवार केवळ घरे निर्माण करत नाही, तर माणसे आणि नाती जोडण्याचे काम करतो. ग्राहकांना दर्जेदार घरे आणि उत्तमोत्तम सोयी-सुविधा देण्यासोबतच त्यांना आनंददायी आणि संस्मरणीय अनुभव देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. लेगसी उमंगसारखे उपक्रम हा याच प्रयत्नांचा एक भाग आहेत.”

गेल्या १९ वर्षांच्या प्रवासात ग्राहकांचा विश्वास आणि सहकार्य हीच लेगसी ग्रुपची सर्वात मोठी ताकद राहिली असून, आगामी काळातही गुणवत्तापूर्ण गृहप्रकल्प आणि ग्राहककेंद्री सेवांच्या माध्यमातून हा विश्वास अधिक दृढ करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

‘लेगसी उमंग २०२६’च्या निमित्ताने साकारलेला हा आनंदोत्सव केवळ वर्धापनदिनाचा सोहळा न ठरता लेगसी परिवारातील नाती अधिक घट्ट करणारा अविस्मरणीय स्नेहमेळावा ठरला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *