लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न
लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न
लायन समाधान आसबे यांची अध्यक्षपदी तर
सुनील ढगे यांची कोषाध्यक्षपदी निवड
पिंपरी : प्रतिनिधी
लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी (क्लब क्र. १३५४३३) च्या सन २०२६-२७ या वर्षासाठीच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण (Installation Ceremony)
सोहळा चिंचवड येथील ZIP by Spree Hotels येथे शनिवारी (दि.१) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या सोहळ्याला इन्स्टॉलिंग ऑफिसर लायन अशोक मिस्त्री (LCIP) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पद व गोपनीयतेची शपथ देऊन आगामी वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच समाजसेवेची परंपरा अधिक व्यापक करण्यासाठी सर्वांनी समर्पित भावनेने कार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी लायन समाधान आसबे यांनी अध्यक्ष, लायन सौरभ कुलकर्णी यांनी सचिव, तर लायन सुनील ढगे यांनी कोषाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.
क्लब ॲडमिनिस्ट्रेटर लायन दामाजी आसबे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व समन्वय साधला.
याप्रसंगी एल एम गव्हर्नर दीपक लोया, क्लबचे माजी अध्यक्ष लायन अविनाश कुलकर्णी, नंदिनी आसबे, विकास साखरे, माजी खजिनदार सुधीर शिंदे,दामोदर शिंदे,सिद्धार्थ आसबे,दगडू आसबे,विकास आसबे,मऱ्याप्पा निकम,दीपक सपकाळ,राहुल सपकाळ,आदींसह सर्व आजी माजी पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नवनियुक्त अध्यक्ष लायन समाधान आसबे यांनी आपल्या मनोगतात आरोग्य, पर्यावरण आणि शिक्षण या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करून वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरे, महिलांसाठी कर्करोग तपासणी, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत तसेच करिअर मार्गदर्शन यांसारखे उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान यावेळी समाजसेवेचा एक भाग म्हणून क्लबच्या वतीने देहू येथील गरीब मुलांचे संगोपन करणाऱ्या संस्थेला ११,००० ची देणगी प्रदान करण्यात आली. या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष स्वागत व कौतुक केले.
कार्यक्रमास क्लबचे पदाधिकारी, सदस्य, ज्येष्ठ लायन्स तसेच विविध लायन्स क्लबचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अँड किरण पवार यांनी कायदेशीर बाबींविषयी मार्गदर्शन केले. तसेच दीपक लोया यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. संस्कृती आसबे यांनी अध्यक्षांचा परिचय करून दिला.
आर्या साखरे,सई शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावीपणे पार पडले, तर आभार प्रदर्शन लायन संभाजी लोखंडे यांनी केले.
यावेळी लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीतर्फे ‘We Serve’ या ब्रीदवाक्यानुसार आगामी वर्षातही समाजहितासाठी विविध सेवा उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.








