शहरशिक्षण-प्रशिक्षण

पिंपळेगुरवमध्ये शिक्षकांकडून दहावीच्या विद्यार्थ्यांचे औक्षण व पुष्पगुच्छांनी स्वागत


पिंपळेगुरव माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचे औक्षण व पुष्पगुच्छांनी स्वागत

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपळे गुरव
येथील माध्यमिक विद्यालय येथील परीक्षा केंद्रात शुक्रवारपासून एस.एस.सी. बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेला उत्साहात प्रारंभ झाला. परीक्षा केंद्रावर पहिल्या दिवशी मराठी विषयाचा पेपर देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी औक्षण करून तसेच गुलाबपुष्प देऊन स्वागत केले आणि त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. शाळेचे प्राचार्य व केंद्रसंचालक पांडुरंग मुदगुण यांनी विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात परीक्षा देण्याचे आवाहन करत प्रामाणिकपणे आणि आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, असे त्यांनी सांगितले. यावेळी पर्यवेक्षिका व उपकेंद्रसंचालक विद्या साळी, ज्येष्ठ शिक्षिका अंजली चौगुले, परीक्षा विभाग प्रमुख कविता चव्हाण, शिक्षक मनोज तळपे, कृष्णराव टकले, श्रीकांत अहिरे, अनिल गायकवाड, सुनील दळवी, प्रिया नांगरे, पूनम घोडके, अश्विनी दांगट, योगिता साळुंखे, निकिता कांबळे, ऋषिकेश घोळवे, ओंकार गावडे, भावेश खैरनार,आशिष मिरोखे, ओंकार लांडे,अशोक कडलग,श्री गवळी, श्री साळुंखे,मुसला शिंदे आदींसह अन्य कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान सकाळी दहा वाजता विद्यार्थी परीक्षा केंद्रात दाखल झाल्यानंतर त्यांना शिक्षकांकडून विविध प्रकारच्या सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यानी कॉपीयुक्त स्टडी मटेरियल तसेच , इलेक्ट्रॉनिक तसेच डिजिटल वस्तू सोबत आणल्या नाहीत याची तपासणी करून विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये सोडण्यात आले.दरम्यान पेपर संपल्यावर पहिला मराठीचा पेपर सोपा गेल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *