प्रभाग २५ मधील भाजपा उमेवारांच्या प्रचार पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
विकासाचे वचन, कमळाचे बटण..!
वाकड–ताथवडे–पुनावळेत परिवर्तनाची प्रेरणादायी सुरुवात
वाकड : प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा उमेदवारांच्या वाकड–ताथवडे–पुनावळे परिसरात प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने परिवर्तनाची नवा दिवस अनुभवायला मिळाला .प्रभाग क्रमांक २५ मधील ताथवडे गावठाण येथील नृसिंह मंदिरापासून सुरू झालेल्या प्रचार पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त आणि विश्वासपूर्ण प्रतिसाद लाभला.
नृसिंह मंदिर, रघुनंदन कार्यालय, ताथवडे गावठाण, खांबेटे वस्ती, लोंढे वस्ती या संपूर्ण मार्गावर नागरिकांनी भाजपाच्या उमेदवारांवर उधळलेले प्रेम, आपुलकी आणि विश्वासामुळे परिसरात उत्साहाचे व सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम, दूरदृष्टीपूर्ण व विकासाभिमुख नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने राज्यात आणि शहरात जनतेचा ठाम विश्वास संपादन केला आहे. त्याच विश्वासाच्या बळावर प्रभाग क्रमांक २५ मधील भाजपाचे अधिकृत उमेदवार कुणाल वैजनाथ वाव्हळकर, भुजबळ रेश्मा चेतन, श्रुती राम वाकडकर आणि राहुल तानाजी कलाटे यांनी प्रभागाच्या सर्वांगीण, संतुलित आणि शाश्वत विकासासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार या प्रचार शुभारंभातून व्यक्त झाला.

स्वच्छ व सुंदर परिसर, भक्कम पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगार व संधी, तसेच नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देण्याचा ठाम संकल्प यावेळी ठळकपणे मांडण्यात आला.
ही केवळ प्रचाराची सुरुवात नसून, तो विश्वास, विकास आणि सेवाभावाच्या नव्या पर्वाची नांदी ठरला आहे. परिवर्तनासाठी, प्रगतीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी कमळाच्या बटणावर मतदान करून भाजपाला सेवेची संधी द्या, असे आवाहन यावेळी उमेदवारांनी केले.








