राजकीयशहर

पिंपळे सौदागरकरांचा एकच नारा “यंदा विकासालाच मत” प्रभाग २८ मध्ये भाजपा उमेदवारांचे सक्षम व सर्वसमावेशक पॅनल


अवघा प्रभाग २८ भाजपमय ; प्रचारात उमेदवारांना उस्फूर्त प्रतिसाद

पिंपरी : प्रतिनिधी

प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागरमध्ये भाजप उमेदवारांचा प्रचार सध्या नागरिकांच्या उत्साहाने फुलून गेला असून, संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गल्लीबोळातून, सोसायट्यांमधून आणि चौकाचौकांतून “विकास, विश्वास आणि स्थैर्य” यासाठी भाजपला मिळणारा पाठिंबा स्पष्टपणे जाणवत आहे.
घराघरांतून उमेदवारांचे स्वागत होत असून, नागरिक स्वतःहून पुढे येत संवाद साधत आहेत. विशेषतः आयटी क्षेत्रातील तरुण, व्यावसायिक आणि मध्यमवर्गीय नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वावर तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख सरकारवर ठाम विश्वास व्यक्त केला आहे. “काम करणाऱ्यांनाच संधी द्यायची” ही भावना मतदारांमध्ये दिसून येत आहे.

 

भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली दिलेला सक्षम, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख पॅनल हा प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशेचा किरण ठरत आहे.
पाणी, रस्ते, वाहतूक, स्वच्छता, सुरक्षा आणि रोजगार यांसारख्या प्रश्नांवर ठोस काम करणारा भाजपच खरा पर्याय असल्याची भावना नागरिकांमध्ये बळावत आहे.
प्रभाग २८ मध्ये “यावेळी विकासालाच मत” हा नारा जोर धरत असून, भाजप उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.

या प्रभागातून शत्रुघ्न काटे, कुंदा भिसे, अनिता काटे आणि संदेश काटे हे चार सक्षम उमेदवार निवडणूक रिंगणात असून, त्यांच्या कार्यपद्धतीला आणि लोकांशी असलेल्या थेट संवादाला नागरिकांची पसंती मिळत आहे. प्रत्येक उमेदवाराने आपल्या भागातील प्रश्न समजून घेत ते सोडवण्यासाठी ठोस आराखडा मांडल्याने मतदारांमध्ये विश्वास अधिक दृढ होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *