ताज्या घडामोडीराजकीय

प्रभाग 31 मधील भाजपा उमेदवारांसाठी रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचा विजयाचा संकल्प


-भाजपच्या माध्यमातून परिसराचा विकास ; उमेदवारांसाठी एकदिलाने काम करण्याची ग्वाही

नवी सांगवीतील मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा भाजप मध्ये प्रवेश

पिंपरी (प्रतिनिधी) :

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३१ मध्ये भारतीय जनता पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महायुतीच्या उमेदवारांसाठी एकदिलाने काम करण्याची ग्वाही रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

प्रभाग क्रमांक ३१ मधील मनसेचे सुरेश सकट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार) कैलास बनसोडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपच्या माध्यमातून परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि उमेदवारांच्या विजयासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प यावेळी त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला.

यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमताने भाजप उमेदवारांना पाठिंबा देत त्यांच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
….

वार्ड क्रमांक ३१ मधील भाजप महायुतीचे उमेदवार दुर्गाकौर आदियाल, ज्ञानेश्वर जगताप, पल्लवी जगताप व नवनाथ जगताप यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे शहराध्यक्ष रमेश गजरमल , शहर सचिव राघू साबळे, उपाध्यक्ष संजय भीमराव गायकवाड, उपकार्याध्यक्ष दगडू क्षीरसागर, चिंचवड विधानसभेचे संघटक सत्यवान कोल्हे तसेच वार्ड क्रमांक २९ व ३१ चे अध्यक्ष आनंद उर्फ आप्पा गायकवाड उपस्थित होते.

 

——

यावेळी बोलताना रिपब्लिकन पार्टी (आठवले गट)च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, भाजपच्या माध्यमातून शहर आणि प्रभागातील विकासकामांना गती मिळाली असून हीच विकासाची परंपरा पुढे नेण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यात येत आहे. सामाजिक न्याय, मूलभूत सुविधा, पायाभूत विकास आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ही युती प्रभावीपणे काम करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. रिपब्लिकन पार्टी कार्यकर्त्यांमुळे या भागात युती अधिक मजबूत होत असून, आगामी निवडणुकीत या उमेदवारांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
————————–


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *