प्रभाग २७ मध्ये सर्वत्र ‘घड्याळा’चाच बोलबाला
आमदार सुनील शेळके, प्रचार प्रमुख नाना काटे यांच्या उपस्थितीत भव्य रॅली ,राष्ट्रवादी पॅनेलच्या उमेदवारांना नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद
पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २७ रहाटणी- तापकीरनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘घड्याळ’ या निवडणूक चिन्हाची जोरदार चर्चा रंगली आहे.
आमदार सुनील शेळके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रचार प्रमुख नाना काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे.
रॅलीदरम्यान राष्ट्रवादी पॅनेलच्या सर्व उमेदवारांचे नागरिकांनी ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी आणि फुलांच्या वर्षामध्ये ही रॅली मार्गस्थ झाली. ‘विकास, विश्वास आणि स्थैर्य’ या मुद्द्यांवर भर देत नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला.
आमदार सुनील शेळके यांनी प्रभागातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण या विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेसची विकासात्मक भूमिका मांडली. तर प्रचार प्रमुख नाना काटे यांनी संघटनात्मक ताकद आणि अनुभवाच्या जोरावर प्रभाग २७ मध्ये राष्ट्रवादी पॅनेलच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.
रॅलीनंतर नागरिकांनी व्यक्त केलेल्या सकारात्मक प्रतिक्रिया आणि वाढता जनसमर्थन पाहता प्रभाग २७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी भक्कम होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. सर्वत्र ‘घड्याळा’चाच बोलबाला असल्याने निवडणूक लढतीत राष्ट्रवादी पॅनेल निर्णायक ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
रहाटणी- तापकीरनगरमध्ये केके फॅक्टर चर्चेत
राष्ट्रवादी काँग्रेसकडून या प्रभागासाठी सुमित रघुनाथ डोळस, अश्विनी चंद्रकांत तापकीर, अनिता कैलास थोपटे आणि सागर खंडूशेठ कोकणे यांना अधिकृत उमेदवार म्हणून संधी देण्यात आली आहे.
अनुभव, सामाजिक कार्य आणि स्थानिक पातळीवरील मजबूत संपर्क यामुळे हा पॅनल सक्षम मानला जात आहे.








