अतुल ट्यूटोरियल्सच्या वतीने यशाचा उत्सव कार्यक्रम संपन्न
अतुल ट्यूटोरियल्सच्या वतीने यशाचा उत्सव कार्यक्रम संपन्न

१०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा झाला गौरव
पुणे : प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड व पुणे परिसरातील नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूट असलेल्या अतुल ट्यूटोरियल्सच्या वतीने विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सन्मान सोहळा २७ जून २०२६ रोजी निळू फुले नाट्यगृह, नवी सांगवी येथे उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमास संस्थापक अतुल मोरे, संचालिका रीना मोरे, तसेच प्रमुख पाहुणे मा. राजू मोरे (निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त) आणि मा. जयप्रकाश भोसले (निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त) उपस्थित होते. दीपप्रज्वलनानंतर श्रावस्ती डोणोलीकर-आळणे हिने सादर केलेल्या भरतनाट्यम नृत्याने कार्यक्रमाची मंगल सुरुवात झाली. सूत्रसंचालन विवेक हिंगे (ब्रांच मॅनेजर) यांनी केले.
यावेळी १०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. दहावीत खुशबू धूत (९९.६० टक्के), कल्याणी बेंदळे (९८.४०टक्के) आणि श्रेया खाडे (९७ टक्के) यांनी विशेष यश संपादन केले. एकूण ७२ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा अधिक गुण, तर ३० विद्यार्थ्यांनी CET परीक्षेत ९० पेक्षा अधिक पर्सेंटाइल मिळवून संस्थेचा गौरव वाढवला.
आलोक सिंग (ब्रांच मॅनेजर) यांनी अतुल ट्यूटोरियल्सच्या गेल्या १२ वर्षांच्या प्रेरणादायी प्रवासाचा आढावा घेत शिक्षण क्षेत्रात संस्थेने निर्माण केलेल्या विश्वासार्ह स्थानाची माहिती दिली. रीना मोरे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. राजू मोरे यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनप्रवासातील प्रेरणादायी प्रसंग सांगत मोठी स्वप्ने पाहण्याचा संदेश दिला, तर जयप्रकाश भोसले यांनी “आज ज्यांचा गौरव झाला त्यांचे अभिनंदन; मात्र आज मंचावर नसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यालाही आयुष्यात मोठे यश मिळवण्याची संधी आहे,” असा प्रेरणादायी संदेश दिला.
कार्यक्रमात *’Atul Gift Card’* या अभिनव उपक्रमांतर्गत पारदर्शक लकी ड्रॉद्वारे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व आकर्षक भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. कार्यक्रमाचे नियोजन चैतन्य जमदाडे (ब्रांच मॅनेजर), प्रणव मोरे, रोशन जाधव तसेच संपूर्ण शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी यशस्वीरीत्या पार पाडले.
समारोपात अतुल मोरे यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहून शिस्त, सातत्य आणि कठोर परिश्रमाच्या बळावर आयुष्यातील सर्वोच्च ध्येय गाठण्याचे आवाहन केले.
*अतुल ट्यूटोरियल्स २०२६ निकाल ठळक वैशिष्ट्ये*
🏆 १००+ विद्यार्थ्यांचा गुणगौरव
⭐ ७२ विद्यार्थी – ९०% पेक्षा अधिक गुण (10वी)
📚 ३०+ विद्यार्थी – CET मध्ये ९०+ पर्सेंटाइल
🎓 १२ विद्यार्थ्यांना १००% शिष्यवृत्ती
🎓 १२ विद्यार्थ्यांना ५०% शिष्यवृत्ती
🎁 १२ विद्यार्थ्यांना आकर्षक गिफ्ट हॅम्पर्स








