ताज्या घडामोडीराजकीय

रहाटणीत भाजप उमेदवारांच्या कोपरा सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद


प्रभाग क्रमांक २७ मधील चारही भाजप उमेदवारांचा नागरिकांशी थेट संवाद

कोपरा सभेतून विकासाचा ठाम संकल्प!

पिंपरी : प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रहाटणी येथील गजानन नगर परिसरात आयोजित भाजपाच्या कोपरा सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सभेत प्रभाग क्रमांक २७ मधील चारही भाजप उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधला.

या वेळी परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा, तसेच पायाभूत विकासकामांबाबत नागरिकांनी आपली मते मांडली .

यावेळी उमेदवारांनी प्रत्येक मुद्दा ऐकून घेत भविष्यातील विकास आराखड्याची सविस्तर माहिती दिली.

सभेदरम्यान संघभावना, पारदर्शक प्रशासन आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा ठाम संकल्प सर्व उमेदवारांनी व्यक्त केला. “नागरिकांचा विश्वास, प्रेम आणि मिळणारा पाठिंबा हेच विकासाच्या पुढील वाटचालीचे खरे बळ आहे,” अशी भावना यावेळी सभेत प्रकर्षाने जाणवली.

नागरिकांनीही भाजप उमेदवारांच्या विकासाभिमुख भूमिकेवर विश्वास व्यक्त करत, आगामी काळात प्रभाग क्रमांक २७ च्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाला साथ देण्याचा निर्धार व भाजपाचे प्रभाग २७ चे सक्षम उमेदवार :

 

▪️ बाबासाहेब त्रिभुवन

▪️ चंद्रकांत नखाते

▪️ सविता खुळे

▪️ अर्चना तापकीर

———

यावेळी नागरिकांशी संवाद साधताना आमदार शंकर जगताप म्हणाले की, प्रभाग क्रमांक २७ मधील भाजपचे उमेदवार अभ्यासू, अनुभवी आणि जनतेच्या प्रश्नांबाबत सजग आहेत. पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक सोयी-सुविधा आणि नागरी प्रश्नांचे कायमस्वरूपी समाधान करण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. “पारदर्शक प्रशासन, वेळेत कामे आणि नागरिकांचा विश्वास हेच भाजपाचे खरे भांडवल आहे,” असेही त्यांनी नमूद केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *