राजकीय

अपक्ष उमेदवार पसरणीकर पायल अमित यांचे जागोजागी औक्षण व स्वागत


नवी सांगवीकरांची उमेदवार, नागरिकांची भावना

पिंपरी : प्रतिनिधी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३१ मधील सर्वसाधारण महिला गटातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या पसरणीकर पायल अमित यांना नवी सांगवी परिसरात नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

कप-बशी हे निवडणूक चिन्ह घेऊन प्रचाराला उतरलेल्या पसरणीकर पायल यांचे ठिकठिकाणी औक्षण करून स्वागत करण्यात येत आहे.

घराघरांतून होत असलेल्या जनसंपर्क मोहिमेदरम्यान महिलावर्गाचा विशेष पाठिंबा दिसून येत असून, “नवी सांगवीकरांची आपलीच उमेदवार” अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

परिसरातील दैनंदिन प्रश्न, महिलांची सुरक्षितता, स्वच्छता, पाणीपुरवठा आदी सुविधांबाबत पसरणीकर या नागरिकांशी थेट संवाद साधत असून, प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

या प्रचारादरम्यान मिळणारा प्रतिसाद पाहून अमित पसरणीकर व पायल पसरणीकर हे दांपत्य भावूक झाल्याचे दिसून येत आहे.

नागरिकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची ग्वाही त्यांनी दिली आहे. महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांकडून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे प्रभाग ३१ मध्ये उत्साहाचे वातावरण असून पसरणीकर पायल यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस गती मिळताना दिसत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *