ताज्या घडामोडीराजकीयशहर

शेकडो समर्थकांसह नखाते बंधूंचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश


कॅबिनेट मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा

पिंपरी : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रहाटणी परिसरातील युवा नेते शरद नखाते व राकेश नखाते यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शुक्रवारी (दि. ९) भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडला.

भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे व आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सोहळा पार पडला. मंत्री पंकजाताई मुंडे या भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ रहाटणी येथे आयोजित सभेसाठी आल्या असताना नखाते बंधूंचा हा प्रवेश करण्यात आला.

 

 

नखाते बंधू व त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे भाजप संघटनात्मकदृष्ट्या अधिक मजबूत झाले असून, परिसरातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
यावेळी शरद नखाते व राकेश नखाते यांनी भाजपच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून पक्षवाढीसाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. उपस्थित मान्यवरांनी नखाते बंधू व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करत आगामी संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *