प्रभाग २५ च्या भाजप उमेदवार श्रुती राम वाकडकर यांचे सर्वत्र उत्स्फूर्त स्वागत
पिंपरी : प्रतिनिधी: पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार श्रुती राम वाकडकर व युवा नेते राम वाकडकर यांनी प्रभाग क्रमांक २५ मधील नागरिकांशी प्रत्यक्ष भेटी घेऊन संवाद साधला. या वेळी नागरिकांनी विविध ठिकाणी औक्षण करून श्रुती वाकडकर यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

प्रभागाची सखोल माहिती असलेल्या, सक्षम आणि महिलांचे प्रभावी प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवार म्हणून श्रुती वाकडकर यांच्याकडे पाहिले जात असून, महापालिकेत महिलांचा ठाम आवाज त्या बनतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.
प्रभागाच्या विविध भागात प्रचारादरम्यान सर्व स्तरातील नागरिकांकाडून श्रुती वाकडकर व त्यांचे पती राम वाकडकर यांचे नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत अशी भावना रहिवाशांनी व्यक्त केली.

वाकडकर परिवाराचे प्रभागातील नागरिकांशी जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे संबंध असल्याचेही या संवादातून दिसून आले.
या भेटीदरम्यान श्रुती वाकडकर यांच्यासह संपूर्ण भाजप पॅनलला प्रभागातील मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी विकासाभिमुख नेतृत्वाला पाठिंबा देण्याची भावना व्यक्त केली.








