नवी सांगवीत सबकी खुशी, ‘कप-बशी’चा नारा,पसरणीकर पायल यांचा जोरदार प्रचार
आज सायंकाळी भव्य प्रचाररॅलीतुन होणार शक्तिप्रदर्शन
पिंपरी : प्रतिनिधी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३१ मध्ये अपक्ष उमेदवार पसरणीकर पायल अमित यांच्या प्रचाराने जोर पकडला आहे. ‘कप-बशी’ या निवडणूक चिन्हावर त्या रिंगणात असून, घराघरांतून, गल्लोगल्ली प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
“सबकी खुशी, कपबशी” या घोषवाक्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पदयात्रा, संपर्क मोहिमा आणि कोपरा सभांमधून मतदारांशी थेट संवाद साधत पायल पसरणीकर यांनी स्थानिक प्रश्नांवर आपली भूमिका मांडली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला-सुरक्षा आणि मूलभूत नागरी सुविधांवर भर देत विकासाभिमुख अजेंडा मतदारांपुढे ठेवला जात आहे.

आज सायंकाळी प्रभागात भव्य प्रचाररॅली काढण्यात येणार असून, या रॅलीला मोठी उपस्थिती लाभण्याची शक्यता आहे. कार्यकर्ते आणि समर्थकांकडून जोरदार तयारी सुरू असून, रॅलीतून शक्तिप्रदर्शन होणार असल्याचे चित्र आहे.
एकूणच, ‘कप-बशी’च्या गजरात पसरणीकर पायल यांचा प्रचार शिगेला पोहोचला असून, येत्या दिवसांत निवडणुकीची रंगत आणखी वाढणार आहे.
अपक्ष उमेदवार पसरणीकर पायल अमित यांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी काढण्यात येणारी भव्य प्रचाररॅली शनी मंदिर, नवी सांगवी येथून सुरू होणार आहे. रॅलीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून, परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘कप-बशी’ या निवडणूक चिन्हाच्या गजरात निघणाऱ्या या रॅलीत कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. फलक, बॅनर, घोषणाबाजी आणि पदयात्रेच्या माध्यमातून मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
नवी सांगवीतील विविध भागांतून ही रॅली मार्गक्रमण करणार आहे. एकूणच, रॅलीच्या माध्यमातून प्रचाराला अंतिम टप्प्यात अधिक वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








