राजकीय

पदयात्रेतून दिसली प्रभाग क्रमांक २६ मधील भाजप उमेदवारांची ताकद


प्रभाग क्रमांक २६ मधील भाजप उमेदवारांच्या पदयात्रेत

हजारोंच्या संख्येने नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

 

वाकड : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक २६ मधील उमेदवार ॲड. विनायक गायकवाड, आरती चोंधे, स्नेहा कलाटे आणि संदीप कस्पटे यांच्या प्रचारार्थ आयोजित पदयात्रेत हजारो नागरिक, भाजप कार्यकर्ते, महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या निवडणुकीत भाजपचे हे पॅनेल पूर्ण ताकदीने मैदानात उतरले असल्याचा स्पष्ट संदेश या पदयात्रेतून देण्यात आला.

 

विशालनगर येथील शेल पेट्रोल पंपापासून पदयात्रेला सुरुवात झाली. डी.पी. रस्त्यावरून काढण्यात आलेल्या या पदयात्रेत पक्षाचे झेंडे, घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. अनेक ठिकाणी मतदारांनी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत करत तोंड गोड केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पदयात्रेत महिलांची लक्षणीय उपस्थिती हे प्रचाराचे विशेष आकर्षण ठरले.
यावेळी उमेदवारांनी घरोघरी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
————————-

 

*सामाजिक हित जपणारे उमेदवार*

भाजपचे हे उमेदवार सामाजिक हित जपणारे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, स्वच्छता तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक व युवकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळेच पदयात्रेला नागरिकांचा मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला

-–——–

राष्ट्रीय बंजारा परिषदेचा जाहीर पाठिंबा

प्रभागातील चारही उमेदवारांचे आजपर्यंतचे लोकोपयोगी कार्य आणि भविष्यातील विकासाचे स्पष्ट व्हिजन लक्षात घेऊन राष्ट्रीय बंजारा परिषदेने भाजप पॅनेलला जाहीर पाठिंबा दिला. यासंदर्भातील पाठिंब्याचे पत्र उमेदवारांना देण्यात आले.
यावेळी परिषदेचे राज्यसंघटक रावसाहेब चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष प्रेमकिसन राठोड, रणजित पवार, अविनाश राठोड, कैलास चव्हाण, अभिजीत चव्हाण, ज्योती राठोड, आकाश राठोड, लालभाऊ चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
देशातील विविध भागांतून उदरनिर्वाहासाठी स्थायिक झालेल्या बंजारा समाजाच्या सामाजिक व मूलभूत समस्या सोडवण्यासाठी हे उमेदवार निश्चितच प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा परिषदेने आपल्या पत्रकात व्यक्त केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *