प्रभाग २९ मध्ये वैशाली राहुल जवळकर यांच्या प्रचाराला जोरदार वेग
खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत काढलेल्या प्रचार पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी : प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २९ मध्ये शिवसेनेच्या (शिंदे गट) ओबीसी गटातील (क) उमेदवार वैशाली राहुल जवळकर यांच्या प्रचाराला नागरिकां मोठा प्रतिसाद मिळत असून मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेमुळे संपूर्ण प्रभागात शिवसेनेचे वातावरण निर्माण झाले .
पदयात्रेदरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ठिकठिकाणी वैशाली जवळकर यांचे औक्षण करून व जल्लोषात स्वागत केले.
“आमच्या हक्काची, आमच्या प्रश्नांची जाण असलेली उमेदवार” अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होताना दिसून आली.
माजी नगरसेविका म्हणून ग्राउंड लेव्हलवर प्रत्यक्ष कामाचा अनुभव, नागरिकांशी असलेला थेट संवाद आणि विकासकामांची ठोस ओळख यामुळे वैशाली जवळकर यांना प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांचा भक्कम पाठिंबा मिळत आहे. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता आणि महिला प्रश्नांवर सातत्याने काम करणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांनी यावेळी बोलताना, “प्रभाग २९ च्या सर्वांगीण विकासासाठी वैशाली जवळकर यांच्यासारखे अनुभवी आणि लोकांमध्ये मिसळणारे नेतृत्व आवश्यक आहे,” असा विश्वास व्यक्त केला.
एकूणच प्रभाग २९ मध्ये शिवसेना शिंदे गटाचा प्रचार जोरात, संघटित आणि जनतेच्या विश्वासावर आधारित सुरू असून, येत्या निवडणुकीत याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.

———————–
पती राहुल जवळकर यांचे प्रभागातील सर्व घटकांशी जिव्हाळ्याचे आणि विश्वासाचे संबंध आहेत. नागरिकांच्या आग्रहास्तव ते निवडणूक प्रक्रियेत सक्रिय झाले असून, सामान्य नागरिकांच्या अडीअडचणीच्या काळात तात्काळ मदतीस धावून जाणे, हा राहुल जवळकर यांचा स्वभाव म्हणून ओळखला जातो.
या दीर्घकाळच्या जनसंपर्काचा आणि विश्वासाचा सकारात्मक परिणाम त्यांच्या पत्नी वैशाली राहुल जवळकर यांच्या प्रचारात स्पष्टपणे दिसून येत आहे. नागरिकांशी असलेली आपुलकी, थेट संवाद आणि मदतीची भावना यामुळे जवळकर दाम्पत्याला प्रभाग २९ मध्ये व्यापक पाठिंबा मिळत आहे.








