राजकीय

प्रभाग २८ मध्ये कुंदाताई भिसे यांच्यासह सर्व भाजपा उमेदवारांची प्रचारात आघाडी


पिंपरी : प्रतिनिधी:

प्रभाग क्रमांक २८,पिंपळे सौदागरमध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार कुंदाताई संजय भिसे यांच्यासह पॅनलमधील अन्य उमेदवार प्रचारात आघाडीवर असल्याचे चित्र दिसून येत आहे.भाजपाने कुंदाताई भिसे यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली असून, मतदारांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

भिसे कुटुंबीय हे परिसरात सर्वपरिचित असून, शेतकरी कुटुंबातून आलेल्या कुंदाताईंचे सर्वसामान्य नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी केवळ निवडणूक काळात नव्हे, तर गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत काम केले आहे.

स्वतःच्या खर्चातून त्यांनी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली असून, उन्नती फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य व सामाजिक उपक्रम राबवले आहेत. याचा थेट फायदा स्थानिक नागरिकांना झाला असून, त्यामुळे त्यांच्याविषयी विश्वास अधिक दृढ झाला आहे. प्रभागातील सोसायटीधारक, महिला वर्ग तसेच तरुणांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे या प्रभागातून कुंदा भिसे यांना सर्वाधिक मते मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

भाजप पॅनेलला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद
कुंदा भिसे यांच्यासह भाजप पॅनेलमधील
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे,
अनिता काटे,
संदेश काटे
या उमेदवारांनाही प्रभागात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असून, भाजपचा प्रचार दिवसेंदिवस अधिक वेग घेत असल्याचे चित्र आहे.


कुंदाताई महापालिकेत बनणार महिलांचा आवाज

भिसे घराण्याची सून आणि काटे कुटुंबाची लेक असलेल्या कुंदाताई भिसे या प्रभाग २८ मधून सर्वसमावेशक आणि विश्वासार्ह चेहरा म्हणून पुढे येत आहेत.

सामाजिक, कौटुंबिक आणि राजकीय अशा तिन्ही पातळ्यांवर त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
महिला सशक्तीकरण, नागरिकांच्या मूलभूत समस्या आणि स्थानिक विकास या मुद्द्यांवर कुंदाताईंची भूमिका ठाम व स्पष्ट आहे. त्यामुळे त्या महापालिकेत गेल्यास महिलांचा बुलंद आवाज बनतील, अशी भावना मतदारांमध्ये व्यक्त होत आहे. पिंपळे सौदागरमधील भिसे व काटे या दोन्ही कुटुंबांशी असलेले नाते, सर्व समाजघटकांशी जिव्हाळ्याचे संबंध आणि जमिनीवर उतरून काम करण्याची त्यांची पद्धत यामुळे त्या सर्वसमावेशक नेतृत्वाचे प्रतीक म्हणून पाहिल्या जात आहेत.
प्रभागातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सोसायटीधारकांकडून त्यांना वाढता पाठिंबा मिळत असून, कुंदाताई भिसे यांची उमेदवारी केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक परिवर्तनाची आशा म्हणूनही पाहिली जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *