ताज्या घडामोडीराजकीय

वैशाली जवळकर यांचे प्रभागातील कार्य कौतुकास्पद”


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना साथ द्या : खासदार श्रीरंग बारणे

पिंपळे गुरव : प्रतिनिधी : प्रभाग क्रमांक ३१पिंपळे गुरव मधील विकासकामांमध्ये सातत्याने सक्रिय राहिलेल्या शिवसेना (एकनाथ शिंदे गट) उमेदवार वैशाली राहुल जवळकर यांचे कार्य कौतुकास्पद असून, त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.

प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना खासदार बारणे म्हणाले की, “वैशाली जवळकर या केवळ उमेदवार नाहीत, तर त्या प्रभागातील प्रत्येक समस्येशी प्रत्यक्ष जोडलेल्या आहेत. रस्ते, पाणी, स्वच्छता, महिला व ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न असोत, त्या नेहमीच पुढाकार घेतात.”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू असलेल्या विकासकामांना अधिक बळ देण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यक्षम, विश्वासार्ह आणि जमिनीवर काम करणारे प्रतिनिधी निवडून देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करायचे असतील, तर प्रभागात सक्षम नेतृत्व हवे आणि ते नेतृत्व म्हणजे वैशाली राहुल जवळकर,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

खासदार बारणे पुढे म्हणाले की, “प्रभाग क्रमांक ३१ चा सर्वांगीण विकास घडवून आणण्याची क्षमता, अनुभव आणि इच्छाशक्ती वैशाली जवळकर यांच्याकडे आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हा प्रभाग विकासाचा आदर्श ठरेल.”


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *