महाराष्ट्रराजकीय

वाकड–ताथवडे–पुनावळेत परिवर्तन अटळ


भाजप उमेदवार श्रुती वाकडकर यांचा झंझावाती जनसंपर्क ‘लढणार आणि बदल घडवणार’चा निर्धार; सोसायट्यांमध्ये थेट संवाद, समस्या निवारणाचे ठोस आश्वासन

पिंपरी–चिंचवड : प्रतिनिधी : पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ ‘क’ मध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे. भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार श्रुती राम वाकडकर यांनी वाकड, ताथवडे आणि पुनावळे परिसरात झंझावाती जनसंपर्क सुरू करत प्रचारात आघाडी घेतली आहे.


विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये प्रत्यक्ष भेटी, संवाद सभा आणि घराघरांत जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचे ठोस आश्वासन दिल्यामुळे त्यांना सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. “केवळ आश्वासन नव्हे, तर कृती करणारे नेतृत्व” अशी त्यांची ओळख निर्माण होताना दिसत आहे.

तरुणांचा उत्साह, ज्येष्ठांचे आशीर्वाद प्रचारादरम्यान श्रुती वाकडकर यांच्या रॅली व बैठकींमध्ये तरुणांचा मोठा सहभाग दिसून येत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद आणि महिला वर्गाचा उत्स्फूर्त पाठिंबा हे त्यांच्या प्रचाराचे विशेष आकर्षण ठरत आहे.“जनतेचा वाढता विश्वास आणि प्रेम पाहता, आपण १०० टक्के निवडून येऊ,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विकासाचा स्पष्ट ‘रोडमॅप’
प्रभागातील प्रलंबित प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत श्रुती वाकडकर यांनी खालील प्रमुख कामांचे आश्वासन दिले आहे :
🔹 पाणी व रस्ते :
पिण्याच्या पाण्याची समस्या आणि अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था प्राधान्याने सोडवणार.
🔹 महिला सुरक्षा व आरोग्य :
महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना आणि आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देणार.
🔹 सर्वांगीण विकास :
आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज, आदर्श प्रभाग उभारण्याचा संकल्प.
प्रचारात या ५ गोष्टी ठरतायत जमेची बाजू
1️⃣ विकासाभिमुख आणि दूरदृष्टीचा दृष्टिकोन
2️⃣ प्रदीर्घ समाजकार्याचा अनुभव
3️⃣ थेट संवाद आणि लोकाभिमुख कार्यपद्धती
4️⃣ स्थानिक प्रश्नांची सखोल जाण
5️⃣ महिलांच्या प्रश्नांवर खंबीर नेतृत्व

————-
“प्रभागातील महिलांशी संवाद साधताना त्यांच्या आरोग्य, सुरक्षा आणि घरगुती प्रश्नांची तीव्रता जाणवली. या प्रश्नांवर केवळ बोलून न थांबता ठोस कृती करणार आहे. जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद हीच माझ्या विजयाची खरी पोचपावती आहे.”
— श्रुती राम वाकडकर
(उमेदवार, प्रभाग क्रमांक २५ ‘क’, भाजपा)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *