महाराष्ट्रराजकीय

वैशाली राहुल जवळकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी


स्वाभिमानाची लढाई म्हणत जवळकर यांचा प्रभाग २९ मध्ये झंझावाती प्रचार

पिंपरी : प्रतिनिधी: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २९ पिंपळे गुरवमधून माजी नगरसेविका वैशाली राहुल जवळकर यांनी शिवसेना (शिंदे गट) या पक्षाची अधिकृत उमेदवारी स्वीकारली आहे.“स्वाभिमानाची लढाई” म्हणत त्यांनी नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) गट क मधून निवडणूक लढवविण्याचा निर्णय घेतला असून आता त्यांच्या प्रचारालाही वेग आल्याचे पहावयास मिळत आहे.उमेदवार वैशाली जवळकर व पती राहुल जवळकर यांचे प्रभागातील विविध सोसायट्यांमध्ये तसेच संपूर्ण प्रभागातून उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे. घराघरांतून नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद, जाहीर पाठिंबा आणि आपुलकीची वागणूक यामुळे जवळकर दांपत्याचा आत्मविश्वास वाढला आहे.

माजी नगरसेविका म्हणून केलेली विकासकामे, स्थानिक प्रश्नांवरील ठाम भूमिका आणि जनतेशी असलेला थेट संवाद हे वैशाली जवळकर यांच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे ठरत आहेत. तर त्यांचे पती राहुल जवळकर यांचा शांत स्वभाव, सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध आणि विकासकामांची दूरदृष्टी मतदारांवर सकारात्मक प्रभाव टाकत असल्याचे चित्र आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारीमुळे प्रभागातील राजकीय समीकरणे बदलत असून, आगामी दिवसांत प्रचारात आणखी चुरस वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून लोकांचा वाढता प्रतिसाद पाहता प्रभाग २९ मधील निवडणूक लढत अधिकच चुरशीची होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *