राजकीयशहर

प्रचाराच्या अंतिम टप्प्यात अपक्ष उमेदवार तेजश्री धनंजय ढोरे पोहोचल्या घराघरात


 

एअर कंडिशनर चिन्हासह अपक्ष उमेदवार तेजश्री ढोरे यांची प्रचारात आघाडी

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू असताना, प्रभाग क्रमांक ३२ मधून अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून अपक्ष उमेदवार असलेल्या तेजश्री धनंजय ढोरे यांनी एअर कंडिशनर या निवडणूक चिन्हासह आपला प्रचार प्रभावीपणे शिगेला नेला आहे.

 


तेजश्री धनंजय ढोरे यांनी प्रचाराच्या निमित्ताने संपूर्ण प्रभाग ३२ पिंजून काढत घरोघरी भेटी देऊन थेट नागरिकांशी संवाद साधला. या घराघरातील संपर्क मोहिमेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी त्यांचे उत्साहात स्वागत केले जात आहे.

 


अपक्ष उमेदवार असूनही, स्पष्ट ओळख असलेले एअर कंडिशनर हे लक्षवेधी चिन्ह आणि सातत्यपूर्ण जनसंपर्क यामुळे प्रचारात त्यांची आघाडी ठळकपणे दिसून येत आहे.
सर्वसामान्य नागरिकांशी जिव्हाळ्याने संवाद साधणारी उमेदवार म्हणून तेजश्री ढोरे यांची ओळख आज “आपल्यातील आपली उमेदवार” अशी होत आहे.
स्वच्छ प्रतिमा, थेट संवाद आणि प्रभागातील प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणारा प्रचार यामुळे अंतिम टप्प्यात तेजश्री ढोरे यांची ताकद वाढताना दिसत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *