सांगवीत अपक्ष उमेदवार तेजश्री धनंजय ढोरे ठरणार ‘जायंट किलर’?
प्रभाग ३२,सांगवीत वारं फिरलल्याची चर्चा
अपक्ष उमेदवार तेजश्री धनंजय ढोरे ठरणार ‘जायंट किलर’?
सांगवी : प्रतिनिधी
सांगवी परिसरात निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात एक मोठा राजकीय चमत्कार घडण्याची चर्चा रंगू लागली आहे. प्रभाग क्रमांक ३२ मधून अनुसूचित जाती प्रवर्गातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या तेजश्री धनंजय ढोरे या अनपेक्षितपणे बाजी पलटवणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
एअर कंडिशनर हे वेगळे आणि लक्षवेधी निवडणूक चिन्ह लाभलेल्या तेजश्री ढोरे यांना प्रभागातील नागरिकांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, त्यांचे पती धनंजय ढोरे यांचे प्रभागातील सर्व घटकांशी असलेले जिव्हाळ्याचे, आपुलकीचे संबंध या निवडणुकीत मोठा फायदा करून देत असल्याचे बोलले जात आहे. सामान्य कुटुंबातील उमेदवार, स्वच्छ प्रतिमा, थेट जनतेशी संवाद आणि कोणत्याही पक्षाच्या दबावाशिवाय लढवली जाणारी ही निवडणूक यामुळे नागरिकांमध्ये वेगळाच उत्साह दिसून येत आहे.
“या जागेवर यावेळी नक्कीच चमत्कार घडणार,” अशी भावना मतदारांमध्ये व्यक्त होत असून, तेजश्री ढोरे या ‘जायंट किलर’ ठरणार अशी जोरदार चर्चा संपूर्ण प्रभागात आहे.








