राजकीयशहर

‘आमचं ठरलंय” म्हणत नवी सांगवीकरांचा पक्का निर्धार


नवी सांगवीकरांचा एक संधी युवा नेतृत्वालाचा नारा  पसरणीकर पायल यांना महापालिकेत पाठवण्याचा संकल्प

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी “आमचं ठरलंय” असे ठामपणे सांगत प्रभाग क्रमांक ३१, नवी सांगवी येथील नागरिकांनी यावेळी युवा नेतृत्वाला संधी देण्याचा पक्का निर्धार केला आहे. प्रभागातून तरुण, सक्षम आणि कार्यक्षम महिला नेतृत्व महापालिकेत पाठवण्याचा सूर सर्वसामान्य नागरिकांतून उमटत असून, त्याचे केंद्रबिंदू ठरत आहेत अपक्ष उमेदवार पसरणीकर पायल अमित.

पसरणीकर पायल यांचे पती अमित पसरणीकर यांनी गेल्या दोन दशकांपासून कोणतेही मोठे पद नसतानाही सामाजिक, लोकहिताची तसेच नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे. मदतकार्य, सामाजिक उपक्रम, प्रशासनापर्यंत नागरिकांच्या समस्या पोहोचवणे अशा अनेक बाबींमध्ये त्यांनी निष्ठेने योगदान दिल्याचे नागरिक आवर्जून सांगत आहेत.

 

प्रभागात सध्या “एक संधी युवा महिला नेतृत्वाला” ही भावना ठळकपणे दिसून येत असून, नागरिकांच्या प्रतिक्रिया त्याची साक्ष देत आहेत. अमित पसरणीकर यांची कार्यक्षमता, युवकांशी असलेली घट्ट नाळ आणि मजबूत संघटनात्मक बांधणी लक्षात घेता पायल पसरणीकर यांना मिळालेली उमेदवारी म्हणजे संपूर्ण प्रभागालाच मिळालेली संधी असल्याची भावना नागरिकांत निर्माण झाली आहे.

या महिला उमेदवार प्रभागाचा चेहरामोहरा बदलतील, विकासाला नवी दिशा देतील, असा ठाम विश्वास मतदारांमध्ये व्यक्त होत असून, त्यामुळे नवी सांगवीत यंदा युवक नेतृत्वाच्या विजयाची चर्चा अधिकच जोर धरू लागली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *