नवी सांगवीत ‘कप-बशी’चा निनाद
प्रभाग ३१ मध्ये अपक्ष उमेदवार पसरणीकर पायल अमित यांच्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी : प्रतिनिधी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, नवी सांगवीतील प्रभाग क्रमांक ३१ मध्ये राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत.
कवडे नगर, ज्ञानेश पार्क, आनंद पार्क, काशीद नगर, सहकारनगर परिसरात सध्या “कप-बशी… कप-बशी!” असा गजर घुमत असून, अपक्ष उमेदवार पसरणीकर पायल अमित यांच्या प्रचाराने संपूर्ण प्रभागाचे लक्ष वेधून घेतले आहे.
मतदानास अवघे काही दिवस शिल्लक असताना अनेक प्रभागांतील लढतींचे चित्र स्पष्ट होत असले, तरी प्रभाग क्रमांक ३१ मध्ये अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. कप-बशी या निवडणूक चिन्हावर रिंगणात उतरलेल्या पसरणीकर पायल अमित यांचा प्रचार सध्या जोमात असून, घराघरांतून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
सुरुवातीला उमेदवारीचे आश्वासन देऊन नंतर उमेदवारी कापण्यात आल्याने तसेच उमेदवारी जाहीर करताना भौगोलिक समतोल न राखल्यामुळे नवी सांगवी परिसरात नाराजीची भावना पसरली होती. याच नाराजीचे रूपांतर आता जनआंदोलनात होत असून, नागरिकांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवत प्रचाराची धुरा स्वतः हाती घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.
या जनभावनेचा थेट फायदा अपक्ष उमेदवार पायल पसरणीकर यांना होत असून, प्रभागात त्यांनी आघाडी घेतल्याचे संकेत मिळत आहेत. युवक वर्ग मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी होत असतानाच, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार आणि व्यापारी वर्गाचाही त्यांना भक्कम पाठिंबा मिळत आहे.
सध्या सुरू असलेल्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात प्रभागाचे नेतृत्व कोण करणार, याचे उत्तर मतपेटीतून मिळणार असले तरी नागरिकांचा कल पसरणीकर यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे.








