राजकीयशहर

मातंग समाज संघटनेचा भाजपला बिनशर्त पाठिंबा


मातंग समाज संघटनेचा भाजपला बिनशर्त पाठिंबा

भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना दिले पाठिंबा पत्र

पिंपरी : प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मातंग समाज संघटनेच्या वतीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला (भाजप) बिनशर्त जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. संघटनेचे शहर व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब खंदारे यांनी भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष मा. शत्रुघ्न (बापू) काटे यांना अधिकृत पत्राद्वारे हा पाठिंबा कळविला आहे. यावेळी संघटनेचे बालाजी कांबळे, गिरीश सोनवणे, भीमराव बरगडे उपस्थित होते.

 

 

संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राज्यात व केंद्रात कार्यरत असलेल्या सरकारने मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. समाजाच्या उन्नतीसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजना, विकासकामे तसेच सामाजिक न्यायाच्या दृष्टीने घेतलेले निर्णय हे अत्यंत कौतुकास्पद असल्याचेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

मातंग समाजाच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली तसेच मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपभाऊ कांबळे, आमदार अमित गोरखे आणि आमदार उमाताई खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत मातंग समाज मोठ्या संख्येने भाजपच्या पाठीशी उभा राहून मतदान करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपची ताकद अधिक वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *