प्रभाग ३१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात
नवी सांगवी : प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिप्ती अंबरनाथ कांबळे, राजेंद्र गणपत जगताप, उमा शिवाजी पाडुळे आणि अरुण श्रीपती पवार हे उमेदवार निवडणूक रिंगणात असून, त्यांनी प्रचाराला चांगलाच वेग दिला आहे.
घराघरांत संपर्क मोहिम, पदयात्रा, कोपरा सभा तसेच जाहीर सभांच्या माध्यमातून उमेदवार थेट नागरिकांशी संवाद साधत आहेत. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि महिला सशक्तीकरण यांसारख्या स्थानिक प्रश्नांवर भर देत नागरिकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत असून, नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मतदानाच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनात्मक ताकद एकवटत प्रचार अधिक तीव्र केला असून, विजयाचा विश्वास उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.








