राजकीयशहर

प्रभाग २८ मध्ये भाजपाच्या चारही उमेदवारांना वाढता कौल


प्रभाग २८ मध्ये भाजपाच्या चारही उमेदवारांना वाढता कौल पिंपळे सौदागरमध्ये ‘कमळ’ फुलणार अशी जोरदार चर्चा.

पिंपरी : प्रतिनिधी:

प्रभाग क्रमांक २८ मध्ये भाजप उमेदवारांनी केलेल्या झंझावाती प्रचारामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडून दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे. प्रचारादरम्यान मिळणारा जनसमर्थन पाहता, प्रभागातील राजकीय चर्चांमध्ये चारही जागांवर भाजपाचे ‘कमळ’ फुलणार हा एकच विषय केंद्रस्थानी आहे.

या प्रभागातून शत्रुघ्न काटे, कुंदा भिसे, अनिता काटे आणि संदेश काटे हे चार सक्षम उमेदवार निवडणूक रिंगणात असून, त्यांच्या कार्यपद्धतीला आणि लोकांशी असलेल्या थेट संवादाला नागरिकांची पसंती मिळत आहे. प्रत्येक उमेदवाराने आपल्या भागातील प्रश्न समजून घेत ते सोडवण्यासाठी ठोस आराखडा मांडल्याने मतदारांमध्ये विश्वास अधिक दृढ होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या विकासाभिमुख धोरणांवर विशेषतः आयटी क्षेत्रातील तरुण, व्यावसायिक वर्ग आणि मध्यमवर्गीय नागरिकांनी ठाम विश्वास व्यक्त केला आहे. “विकास, सुरक्षितता आणि स्थैर्य” या त्रिसूत्रीवर भाजपच खरा पर्याय असल्याची भावना नागरिकांमध्ये प्रबळ होत आहे.

भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उभे राहिलेले हे सर्वसमावेशक पॅनल प्रभाग २८ च्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज असल्याचा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. वाढता प्रतिसाद आणि उत्साह पाहता, येत्या निवडणुकीत प्रभाग २८ मध्ये भाजपाच्या चारही जागांवर विजय मिळणार, अशी जोरदार चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.

 

कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांची आज सभा

पिंपळे सौदागर, रहाटणी,काळेवाडी परिसरातील भाजपाच्या उमेदवारांच्या प्रा प्रचारार्थ भाजपा नेत्या,कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांची आज सायंकाळी रहाटणी येथील विमल गार्डन येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मराठवाडा भागातील हजारो नागरिक या परिसरात वास्तव्यास आहेत. या सभेमूळे अन्य प्रभागासह पिंपळे सौदागरमध्ये भाजपा उमेवारांचे मताधिक्य वाढण्यास मदत होणार अशी चर्चा आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *