महाराष्ट्रराजकीय

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सभेने चित्र बदलले


प्रभाग २७ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना भरगोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन

पिंपरी : प्रतिनिधी:  पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाहीर सभेने प्रभाग क्रमांक २७ मधील राजकीय चित्रच बदलून टाकले आहे. पवार यांच्या प्रभावी व आक्रमक भाषणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली असून, संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

काळेवाडी येथे आयोजित सभेत बोलताना अजितदादा पवार यांनी विकास, सक्षम नेतृत्व आणि जनतेच्या विश्वासावर आधारित राजकारणावर भर दिला. “प्रभाग २७ चा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलला भरगोस मतांनी विजयी करा,” असे स्पष्ट आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

अजितदादा पवार यांनी प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, शिक्षण आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी या मुद्द्यांचा उल्लेख करत, महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मजबूत प्रतिनिधित्व आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या पाठिंब्याची ग्वाही दिली.
या सभेला नागरिकांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला. महिलावर्ग, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. सभेनंतर प्रभाग २७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या विजयाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

प्रभागाच्या विकासासाठी सक्षम उमेदवारच हवे – अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रभाग २७ चे अधिकृत उमेदवार म्हणून सुमित रघुनाथ डोळस, अश्विनी चंद्रकांत तापकीर, अनिता कैलास थोपटे सागर खंडूशेठ कोकणे या प्रत्येक उमेदवाराचे नाव खास उल्लेखत अजितदादा यांनी जनतेसमोर मांडले. “हे सर्व उमेदवार प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध असून, त्यांच्या माध्यमातूनच या परिसराचा सर्वांगीण विकास साधला जाईल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सभेत अजित पवार यांनी प्रत्येक उमेदवाराची ओळख, त्यांचे सामाजिक कार्य, जनतेशी असलेली नाळ आणि विकासाबाबतची भूमिका अधोरेखित केली. महापालिकेत अनुभव, कार्यक्षमता आणि जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले प्रतिनिधी निवडून देणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *