सांगवीत शिवसेना उमेदवारांच्या रॅलीला अभूतपूर्व गर्दी
प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात
प्रभाग ३२ वातावरण बदलल्याची चर्चा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सांगवी : प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगवी परिसरात शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांच्या
रॅलीला सोमवारी सायंकाळी उस्फूर्त प्रतिसाद लाभला. या रॅलीला लाभलेली अभूतपूर्व गर्दी पाहता प्रभागातील राजकीय वातावरण पूर्णतः फिरल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे.

प्रभाग क्रमांक ३२ मधून शिवसेना (शिंदे गट) कडून अनुसूचित जाती महिला प्रवर्ग (अ) मधून सारिका कृष्णा भंडलकर, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ब) मधून निलिमा महेश भागवत आणि सर्वसाधारण खुल्या गटातून सुमित अरविंद भोसले व शिवसेना पुरस्कृत शारदा सोनवणे( क) (निवडणूक चिन्ह सफरचंद) हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या चारही उमेदवारांनी एकत्रितपणे काढलेल्या या रॅलीत युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक घटक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ढोल-ताशांच्या गजरात, शिवसेनेच्या घोषणा देत रॅली सांगवीतील प्रमुख चौक व वसाहतींमधून मार्गस्थ झाली. ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत पाठिंबा दर्शविला. काही ठिकाणी महिला मतदारांनी औक्षण करून उमेदवारांना शुभेच्छा दिल्या, तर युवकांनी जोशपूर्ण घोषणा देत वातावरण भारावून टाकले.
या रॅलीनंतर प्रभागात “यावेळी चित्र बदलणार” आणि “वातावरण शिवसेनेच्या बाजूने झुकत असल्याचे” बोलले जात आहे. उमेदवारांनीही नागरिकांशी थेट संवाद साधत विकास, पारदर्शक कारभार व स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले.
अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या प्रचारात शिवसेना उमेदवारांच्या या शक्तिप्रदर्शनामुळे सांगवीतील राजकीय गणिते बदलत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

शारदा सोनवणे यांच्या सहभागामुळे पॅनलची ताकद वाढली
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना पुरस्कृत उमेदवार शारदा सोनवणे यांच्या सक्रिय सहभागामुळे सांगवीतील शिवसेना पॅनलला मोठे बळ मिळाले आहे. त्यांच्या सहभागामुळे प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शारदा सोनवणे या सांगवी परिसरात सामाजिक कार्यासाठी परिचित चेहरा असून महिला, युवक व सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांचा मोठा संपर्क आहे. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे आणि जनसंपर्कामुळे शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराला प्रभावी दिशा मिळत असल्याचे दिसून येत आहे.

रॅली, घरभेटी, बैठका तसेच मतदारांशी थेट संवाद साधताना शारदा सोनवणे या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्याचे चित्र आहे. त्यांच्या सहभागामुळे पॅनल अधिक मजबूत झाल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शारदा सोनवणे यांच्या उपस्थितीमुळे शिवसेना पॅनलचा आत्मविश्वास वाढला असून, सांगवीत शिवसेनेच्या बाजूने वातावरण झपाट्याने तयार होत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.








