राजकीय

प्रभाग २१ मध्ये सर्वत्र भाजपमय वातावरण


पिंपरी गाव, अशोक थिएटर परिसरात भाजप उमेदवारांना वाढता पाठिंबा

पिंपरी : प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २१ मध्ये भाजपा आणि आरपीआय (आठवले) पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या पदयात्रेला नागरिकांचा उस्फूर्तपणे प्रतिसाद लाभत आहे.

प्रभाग क्रमांक २१ चे उमेदवार उषाताई वाघेरे, मोनिकाताई निकाळजे, गणेश ढाकणे, नरेश पंजाबी यांच्यासह भाजप, आरपीआयचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपरी गाव येथून भाजपाच्या उमेदवारांनी पदयात्रेद्वारे मतदारांची थेट संवाद साधला. याप्रसंगी वैष्णोदेवी माता मंदिर, श्री. सत्यनारायण मंदिर आदी ठिकाणी उमेदवारी दर्शन घेत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात सुरू झालेल्या या पदयात्रेत कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता भाजपाची ताकद प्रकर्षाने दिसून आली. पदयात्रेत ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकांनी रस्त्याच्या कडेला उभे राहून पदयात्रेचे जल्लोषात स्वागत केले.

चारही गटांतील उमेदवारांनी एकत्रितपणे पदयात्रेत सहभाग घेत मतदारांशी थेट संवाद साधला. स्थानिक विकास, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, वाहतूक आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर भर देत प्रचार करण्यात आला. कामाच्या जोरावरच मतदारांपर्यंत जात आहोत, अशी भावना उमेदवारांकडून व्यक्त होत होती.

यावेळी बोलताना उषा वाघेरे म्हणाले की, माझ्यासह इतर तीनही उमेदवारांच्या प्रचारावेळी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद मिळत आहेत. नागरिकांचा हा प्रतिसाद पाहता विजय निश्चितच आपलाच आहे. प्रभाग क्रमांक २१ मध्ये भाजपच्या पदयात्रेला भरघोस प्रतिसाद मिळाला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *