उद्योगशहरसामाजिक

धर्मवीर संभाजी अर्बन बँक हिंजवडी शाखेचा १७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा


धर्मवीर संभाजी अर्बन बँक हिंजवडी शाखेचा १७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पिंपरी : प्रतिनिधी

पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या धर्मवीर संभाजी अर्बन बँकेच्या, हिंजवडी शाखेचा १७ वा वर्धापन दिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी बँकेचे संस्थापक तथा विद्यमान अध्यक्ष बाबुराव उर्फ आप्पासाहेब शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाला बँकेचे उपाध्यक्ष राहुल जाधव पाटील, मराठवाडा मित्र मंडळाचे सर्वेसर्वा तथा वृक्षमित्र अरुण पवार, संचालक गोकुळ शितोळे, गोरक्षनाथ झोळ, सुभाष शिंदे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन कुलकर्णी, संजय जगताप यांच्यासह बँकेचे सभासद दत्तात्रय जांभुळकर, शिवनाथ जांभुळकर, सुनिल ससार, बाळू सावंत, जालिंदर तापकीर, शंकर हुलावळे, अनिल रसाळ, राजाराम मोहिते, सुनिल सावंत, बाळासाहेब पायगुडे, शंकर साखरे आदी उपस्थित होते.

 

यावेळी सहकार क्षेत्रातील सहकार्य, सेवा आणि समृद्धी या संकल्पनांवर विचारविनिमय करण्यात आला. सहकार चळवळ अधिक बळकट होऊन समाजाच्या विकासात कायम अग्रेसर राहावी, असे मार्गदर्शन मान्यवरांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी हिंजवडी शाखेतील सेवकवृंद यांनी उपस्थितांचे आभार मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *