प्रभाग 26 मध्ये यंदाही ‘भाजपाला अनुकूल वातावरण
प्रभागात कमळ फुलणार ;कार्यकर्त्यांनी व्यक्त केला विश्वास
मतदारांना विश्वास; भाजप उमेदवारांना विजयाची खात्री ..
पिंपरी : प्रतिनिधी
कोपरा सभा, बैठका, रॅली आणि भव्य पदयात्रा काढत प्रभाग क्र. 26 मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी सलग दहा दिवस चाललेल्या नियोजनबद्ध प्रचाराची अखेर सांगता केली.
या प्रभागातील उमेदवार ॲड. विनायक गायकवाड, आरती चोंधे, स्नेहा कलाटे आणि संदीप कस्पटे यांनी मंगळवारी (ता. 13) दिवसभर समर्थकांसमवेत प्रत्येक कॉलनी, सोसायट्या व मुख्य रस्त्यांवर मोठे शक्तिप्रदर्शन केले. त्याचबरोबर वयक्तिक भेटीगाठीतून संवाद साधत मतदारांची मने जिंकली. हे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास मतदारसंघातील नागरिकांनी बोलून दाखवला.
मराठी, हिंदीसह इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेले उमेदवार भाजपाने दिल्याने हे प्रभाग विकासासाठी सक्षम असल्याचे मतदारांनी सांगितले. स्नेहा कलाटे यांच्या रूपातून प्रभागाला उच्चशिक्षित नवीन चेहरा लाभला आहे, तर त्या जोडीला नगरसेवकपदाचा दीर्घ अनुभव व विकासाभिमुक दृष्टिकोन असलेले विनायक
गायकवाड, आरती चोंधे व संदीप कस्पटे यांच्यासारखे शिलेदार गड राखण्यासाठी सज्ज झाल्याने या प्रभागात ‘कमळ’च फुलणार, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
गुरुवारी (ता. 15) महानगरपालिकेच्या सर्व प्रभागातील मतदान होणार आहे. त्यासाठी भाजप उमेदवारांकडून गेल्या दहा दिवसांपासून आक्रमक प्रचार सुरू होता. विजयाचा गड सर करण्यासाठी प्रचाराचा अक्षरशः धुराळा उडवून दिल्याचे पाहायला मिळाले. अखेर मंगळवारी सायंकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आणि प्रभागातून निघालेल्या रॅलीने प्रचाराची सांगता झाली.
सलग दहा दिवस पदयात्रेच्या माध्यमातून उमेदवारांनी प्रभागाचा कानकोपरा पिंजून काढला. त्यातून जनसामान्यांचे प्रश्न समजून घेतले. तसेच, आयटीयन्स वास्तव्यास असलेला मोठा मतदारवर्ग असलेल्या सोसायट्यांमध्ये बैठका आयोजित करून त्यांचा विकासबाबतचा दृष्टिकोन, दैनंदिन जीवनात त्यांना भेडसावणाऱ्या सामाजिक अडचणी समजून घेण्यावर
उमेदवारांनी विशेष भर दिला. त्याचबरोबर, आतापर्यंत केली गेलेली विकासाची व लोकोपयोगी कामे सांगतानाच आगामी काळात करण्यात येणाऱ्या कामांचा लेखाजोखाही त्यांनी आपल्या ‘व्हिजन’मधून मांडला.
“नागरिकांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांवर आम्ही नक्कीच खरे उतरू,”अशी खात्री उमेदवारांनी बोलून दाखविली.








