राजकीयशहर

पसरणीकर पायल यांच्या पदयात्रा रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद,फुलांची उधळण, जागोजागी उत्स्फूर्त स्वागत


नवी सांगवी : प्रतिनिधी: प्रभाग क्रमांक ३१ ,नवी सांगवीमधील अपक्ष उमेदवार पसरणीकर पायल अमित यांच्या पदयात्रा रॅलीला नवी सांगवी परिसरात अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी फुलांची उधळण करत नागरिकांनी रॅलीचे जोरदार स्वागत केले. महिलांनी औक्षण करत पायल पसरणीकर यांना शुभेच्छा दिल्याने संपूर्ण वातावरण भावनिक आणि उत्साही झाले होते.

शनी मंदिरापासून पदयात्रेला सुरुवात झाली. संपूर्ण प्रभागातून काढण्यात आलेल्या या रॅलीने अवघ्या परिसरात ‘कपबशी’ चीच चर्चा होती.

या भव्य पदयात्रेत आबालवृद्ध, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘कप-बशी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. रॅलीदरम्यान नागरिकांचा उत्साह आणि पाठिंबा पाहून पसरणीकर दांपत्य भारावून गेले.

यावेळी पायल पसरणीकर म्हणाल्या, “नवी सांगवीकरांनी दाखवलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेन. प्रभागातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावून नागरिकांना दिलासा देणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट आहे.” स्थानिक रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला-सुरक्षा आणि नागरी सुविधांवर विशेष लक्ष दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

 

रॅलीच्या निमित्ताने नवी सांगवीकरांनी एकच निर्धार व्यक्त केला—“यंदा आपलाच उमेदवार महापालिकेत पाठवायचा.” एकूणच, या पदयात्रेने पसरणीकर पायल यांच्या प्रचाराला मोठी ताकद मिळाली असून, प्रभाग ३१ मधील निवडणूक लढतीत रंगत अधिकच वाढली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *