उद्योगराजकीयशहर

सांगवीत अवघा प्रभाग क्रमांक ३२ भाजपमय


तृप्ती कांबळे, माई ढोरे, हर्षल ढोरे, प्रशांत शितोळे यांच्या प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद

 

अवघा प्रभाग क्रमांक ३२ झाला भाजपमय
पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३२ मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तृप्ती कांबळे, माई ढोरे, हर्षल ढोरे आणि प्रशांत शितोळे यांच्या प्रचार फेऱ्या, पदयात्रा, कोपरा सभा आणि घरभेटी दरम्यान नागरिकांचा मोठा सहभाग पाहायला मिळत आहे.
विकासकामांचा ठोस आढावा, प्रलंबित प्रश्नांवर स्पष्ट भूमिका आणि थेट संवाद साधणारी प्रचारशैली यामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, तसेच युवकांचा वाढता सहभाग हे प्रचाराचे वैशिष्ट्य ठरत आहे.
प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि सार्वजनिक सोयीसुविधांबाबत उमेदवारांनी मांडलेल्या विकासात्मक संकल्पनांना नागरिकांकडून भरघोस पाठिंबा मिळत असून, संपूर्ण प्रभागात भाजपमय वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र दिसत आहे.

 

——-

  1. विजय पक्का; प्रतीक्षा लीडची
    प्रभाग क्रमांक ३२ मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचाराला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. प्रत्येक गल्लीबोळात, वस्ती-वस्तीत आणि चौकाचौकात भाजपच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून, मतदारांचा कल स्पष्टपणे भाजपकडे झुकलेला दिसत आहे.
    निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भाजपने घेतलेली आघाडी निर्णायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात असून आता केवळ अधिकृत निकालातील लीडची प्रतीक्षा असल्याचे वातावरण प्रभागात निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *