रस्त्यावर उतरून प्रश्न सोडवणारे नेतृत्व : वैशाली जवळकर
वैशाली राहुल जवळकर यांना प्रभाग २९ मधून भावनिक पाठिंबा
पिंपरी : प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक केवळ राजकीय गणितांची नसून, जनतेच्या विश्वासाची आणि नात्यांची कसोटी ठरत असल्याचे चित्र प्रभाग क्रमांक २९ ,पिंपळे गुरवमध्ये दिसून येत आहे. विविध माध्यमांतून एकतर्फी वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न होत असले, तरी प्रत्यक्षात जनतेच्या मनात आणि घराघरांत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) उमेदवार वैशाली राहुल जवळकर यांच्याविषयी आपुलकी, विश्वास आणि पाठिंबा ठळकपणे जाणवत आहे.
पिंपळे गुरव येथील कल्पतरू, काशीद पार्क, सुदर्शन नगर, जवळकर नगर, लक्ष्मी नगर, रामकृष्ण चौक, पिंपळे गुरव गावठाण, साठ फुटी रोड, मोरया पार्क, वैदू वस्ती आदी भागांमध्ये सुरू असलेल्या प्रचारादरम्यान केवळ मतांची मागणी नव्हे, तर अनुभवांची देवाणघेवाण होत आहे. घराघरांतून “आमच्या सुख-दुःखात नेहमी दिसणारी व्यक्ती” म्हणून वैशाली जवळकर यांचे नाव आपुलकीने घेतले जात आहे.
अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या वैशाली राहुल जवळकर यांनी निवडणुकीच्या पलीकडे जाऊन नागरिकांचे प्रश्न ऐकले, सोडवले आणि त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच मतदारांमध्ये “या वेळी चेहरा नव्हे, तर माणूस पाहून मतदान करायचे” अशी ठाम भावना निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिक भावुक शब्दांत सांगतात की, अडचणीच्या वेळी फोन उचलणारे, रस्त्यावर उतरून प्रश्न सोडवणारे नेतृत्व आम्हाला हवे आहे.” ही भावना प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या मनात खोलवर रुजलेली आहे.

याच भावनिक नात्याच्या बळावर शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या वैशाली राहुल जवळकर यांना प्रभाग क्रमांक २९ मधील प्रत्येक वस्ती, चौक आणि घरातून वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.
राजकीय जाणकारांचे मत आहे की, ही निवडणूक केवळ प्रचाराची नव्हे, तर विश्वासाची आणि आपुलकीची लढाई ठरत असून, सध्याच्या वातावरणात शिवसेना (शिंदे गट) उमेदवार वैशाली राहुल जवळकर यांच्या बाजूने भावनिक लाट तयार होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.









