गणेश नगर भागात पसरणीकर पायल यांचे उत्साहात स्वागत
पिंपरी : प्रतिनिधी : प्रभाग क्रमांक ३१ मधील सर्वसाधारण महिला गटातून( क) अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या पसरणीकर पायल अमित यांचे नवी सांगवीतील गणेश नगर परिसरात नागरिकांनी उत्साहात स्वागत केले.कपबशी हे निवडणूक चिन्ह घेऊन प्रचार करत असलेल्या पायल पसरणीकर यांचे ठिकठिकाणी औक्षण करून शुभेच्छा देत स्वागत करण्यात आले.
या वेळी महिलावर्गाचा विशेष उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळाला. घराघरांतून नागरिकांनी पुढे येत “आपल्या परिसरातील, आपल्या प्रश्नांची जाण असलेली उमेदवार” अशी भावना व्यक्त केली. स्थानिक समस्या, महिला सक्षमीकरण, स्वच्छता, पाणी व मूलभूत नागरी सुविधांबाबत पसरणीकर पायल यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत आपली भूमिका मांडली.

अमित पसरणीकर व पायल पसरणीकर या दांपत्याचा साधेपणा, लोकांशी असलेली आपुलकी आणि सतत संपर्कात राहण्याची वृत्ती यामुळे गणेश नगर परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, प्रचाराला मिळणारा वाढता पाठिंबा लक्षवेधी ठरत आहे.








