निवडणूक प्रचारात ‘लाडक्या बहिणींचा’ राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रभाग क्र. ३१ मधील दिप्ती कांबळे, राजेंद्र जगताप, उमा पाडुळे व अरुण पवार यांना वाढता पाठिंबा
पिंपरी | प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला वेग आला असून, प्रभाग क्रमांक ३१ मधील उमेदवारांना ‘लाडक्या बहिणींकडून’ ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिप्ती अंबरनाथ कांबळे, राजेंद्र गणपत जगताप, उमा शिवाजी पाडुळे व अरुण श्रीपती पवार यांच्या प्रचार फेरीदरम्यान महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळत आहे.
घराघरांतून पुढाकार घेत लाडक्या बहिणींनी उमेदवारांचे औक्षण करत फुलांची उधळण केली. या स्वागतामुळे प्रचाराला भावनिक रंग चढला असून, महिलांचा विश्वास आणि आपुलकी ठळकपणे दिसून येत आहे.
प्रचारादरम्यान उमेदवारांनी महिलांशी थेट संवाद साधत प्रभागातील मूलभूत समस्या, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य व सुरक्षिततेसह स्थानिक विकासावर सविस्तर चर्चा केली. महिलांनी आतापर्यंत झालेल्या विकासकामांबाबत समाधान व्यक्त करत पुढील काळातही सुविधा, सुरक्षितता आणि सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देण्याची अपेक्षा मांडली.

महिलांच्या या विश्वासाला आणि अपेक्षांना सकारात्मक प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सर्वसमावेशक विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत आहेत. प्रचाराला मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादामुळे उमेदवारांचे मनोबल उंचावले असून, एकूणच प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महिलांचा वाढता सहभाग हा प्रचाराचा विशेष ठरतो आहे.
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सकारात्मक वातावरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या आत्मविश्वासात भर पडत आहे.
‘लाडकी बहिण’ उपक्रमातून महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत सर्वसमावेशक विकास साधण्याचा आमचा संकल्प आहे. महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल.
— राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक व उमेदवार








