महाराष्ट्रराजकीय

मनोजदादा जरांगे यांचा आशीर्वाद घेऊन अपक्ष उमेदवार पायल पसरणीकर यांच्या प्रचाराला भव्य सुरुवात


पिंपरी : प्रतिनिधी : मराठा समाजाचे नेते मनोजदादा जरांगे यांचे आशीर्वाद घेऊन अपक्ष उमेदवार पायल अमित पसरणीकर यांनी आपल्या निवडणूक प्रचाराची अधिकृत सुरुवात केली.

“सामान्यांची उमेदवार” अशी ओळख निर्माण केलेल्या पायल पसरणीकर या आता कप–बशी हे निवडणूक चिन्ह घेऊन घरोघरी जाऊन थेट मतदारांशी संवाद साधत आहेत.


प्रचाराच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांचा, तरुणांचा तसेच ज्येष्ठ नागरिकांचा पाठिंबा पाहायला मिळत असून, “आपल्यातलीच एक उमेदवार” अशी भावना मतदारांमध्ये दिसून येत आहे. विकास, पारदर्शकता आणि सर्वसामान्यांचे प्रश्न थेट सभागृहात मांडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

मनोजदादा जरांगे यांच्या आशीर्वादामुळे प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली असून, सामाजिक न्याय, हक्क आणि स्वाभिमानाचा आवाज बुलंद करण्यासाठी पायल पसरणीकर मैदानात उतरल्या असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

नवी सांगवी प्रभागात अपक्ष उमेदवार म्हणून पायल पसरणीकर यांची घरोघरी सुरू असलेली प्रचारफेरी चर्चेचा विषय ठरत असून, आगामी निवडणुकीत कप–बशी चिन्ह मतदारांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास समर्थकांनी व्यक्त केला आहे.

——————————————-
मुंबईकडे निघालेल्या आंदोलनाच्या मोर्चात सांगवी फाट्यावर जरांगे यांचे जंगी स्वागत; त्या आठवणींना आज उजाळा

मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी मनोजदादा जरांगे यांचा ऐतिहासिक मोर्चा मुंबईकडे रवाना झाला होता, त्या वेळी सांगवी फाटा येथे अमित पसरणीकर यांनी मनोजदादांचे जंगी व भावनिक स्वागत केले होते. त्या क्षणांनी आज पुन्हा एकदा आठवणींना उजाळा दिला आहे.

मोर्चा सांगवी फाट्यावर पोहोचताच फुलांचा वर्षाव, घोषणांचा जयघोष आणि प्रचंड गर्दीतून मनोजदादांचे स्वागत करण्यात आले होते. त्या वेळी पसरणीकर यांनी आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहत, समाजाच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या लढ्याला आपला सक्रिय पाठिंबा जाहीर केला होता.

आज मनोजदादा जरांगे यांचे आशीर्वाद घेऊन पायल पसरणीकर यांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केल्याने, त्या संघर्षाच्या, विश्वासाच्या आणि सामाजिक बांधिलकीच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. आंदोलनाच्या काळात निर्माण झालेला हा ऋणानुबंध आज राजकीय प्रवासातही दिसून येत आहे.

सामाजिक प्रश्नांवर भूमिका घेणारी, संघर्षात सहभागी होणारी आणि सामान्य जनतेशी नातं जपणारी उमेदवार अशी प्रतिमा पायल पसरणीकर यांची तयार झाली असून, सांगवी फाट्यावरचे ते जंगी स्वागत आजही अनेकांच्या स्मरणात कायम आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *