महाराष्ट्रराजकीय

प्रभाग क्रमांक ३१, नवी सांगवीत भाजप उमेदवारांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


पिंपरी : प्रतिनिधी :प्रभाग क्रमांक ३१, नवी सांगवी येथे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, संपूर्ण परिसरात निवडणुकीचे वातावरण तापले आहे. चारही उमेदवार विकासाचे ठोस व्हिजन घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरले असून, “विकास, विश्वास आणि सातत्य” या त्रिसूत्रीवर आधारित प्रचार करत आहेत.

दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे आशीर्वाद आणि स्मृती मनात ठेवून, विद्यमान आमदार शंकरभाऊ जगताप यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी तसेच प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी भावना चारही उमेदवारांनी व्यक्त केली. नागरिकांच्या मूलभूत समस्या, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या विषयांवर भर देत विकासाचे स्पष्ट रोडमॅप मतदारांसमोर मांडण्यात येत आहे.

या प्रभागातून अनुसूचित जाती (अ) गटातून दुर्गा आदियाल,
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ब) गटातून ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप,सर्वसाधारण महिला (क) गटातून पल्लवी जगताप,
सर्वसाधारण खुला (ड) गटातून नवनाथ जगताप
असे चार उमेदवारांचे सक्षम, अनुभवी आणि सर्वसमावेशक पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे.
घराघरांत जनसंपर्क, नागरिकांशी थेट संवाद, स्थानिक प्रश्नांवर चर्चा आणि विकासकामांचा लेखाजोखा मांडत भाजपच्या या पॅनलला सर्व स्तरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. येत्या काळात प्रचार अधिक वेग घेणार असून, प्रभाग क्रमांक ३१ मध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

————— —-

नवी सांगवीकर लक्ष्मणभाऊंचे कार्य कधीही विसरणार नाहीत

जगताप परिवारावरचा विश्वास आजही तितकाच दृढ*

प्रभाग क्रमांक ३१, नवी सांगवी…
हा केवळ एक प्रभाग नाही, तर दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या अथक परिश्रमांची, विकासाची आणि लोकांशी जिव्हाळ्याच्या नात्याची साक्ष देणारा परिसर आहे. “काम बोलतं” हीच त्यांची ओळख होती आणि म्हणूनच आजही नवी सांगवीकर लक्ष्मणभाऊंचे कार्य विसरू शकलेले नाहीत.
याच भावनिक नात्याच्या पायावर उभा राहून भाजपचे चार उमेदवार विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. प्रचारादरम्यान नागरिकांच्या डोळ्यांत आजही लक्ष्मणभाऊंच्या आठवणींची झलक दिसते, तर त्यांच्या नावाचा उल्लेख होताच वातावरण भारावून जाते.
“लक्ष्मणभाऊ गेले असले तरी त्यांचे विचार, त्यांचे काम आणि त्यांची माणुसकी आजही आमच्या सोबत आहे. विद्यमान आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या माध्यमातून हा विकासाचा प्रवास अधिक गतीने पुढे नेण्याचा आमचा निर्धार आहे,” अशी भावना उमेदवारांनी व्यक्त केली.

नवी सांगवी परिसराने नेहमीच जगताप परिवाराच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत विश्वास दाखवला आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता ते समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचे काम लक्ष्मणभाऊंनी केले आणि तोच वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आजच्या पिढीतील उमेदवार समर्थपणे पेलत आहेत, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.
घराघरांतून मिळणारा प्रतिसाद, आपुलकीची हाक आणि “आमचा माणूस” ही भावना, यामुळे प्रभाग क्रमांक ३१ मध्ये भाजप पॅनलच्या प्रचाराला भावनिक बळ मिळत असून, नवी सांगवीकर पुन्हा एकदा विकासाच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *