माध्यमिक विद्यालय पिंपळे गुरव शाळेमध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा
माध्यमिक विद्यालय पिंपळे गुरव शाळेमध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा
विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन
पिंपरी : प्रतिनिधी
मराठी साहित्यातील ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माध्यमिक विद्यालय पिंपळे गुरव शाळेमध्ये मराठी भाषेचा वारसा जपण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची आवड निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांच्या साह्याने मराठी भाषा दिन व पुस्तक अशा आकारात बसून विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे व लेखन साहित्याचा आस्वाद घेतला आणि पुस्तकांचे वाचन केले. कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांनी स्वरचित कवितांचे गायन केले. आपले मनोगत व्यक्त केले. निबंध लेखन स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा ,काव्यवाचन स्पर्धा इत्यादींचे आयोजन करण्यात आले होते. शाळेत मराठी भाषेच्या पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. ग्रंथदिंडी काढण्यात आली. मराठी भाषेच्या माध्यमातून उपलब्ध असणाऱ्या रोजगाराच्या संधीबाबत चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. मुख्याध्यापक मुदगुण पांडुरंग शंकर यांनी आधुनिक तंत्रज्ञानात मराठी भाषेचा वापर वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेच्या पर्यवेक्षिका विद्या साळी यांनी मराठी भाषेचे महत्व विषद केले. अनिल गायकवाड यांनी आपल्या गोड आवाजात मराठी भाषेचं कौतुक आपल्या गाण्यातून सादर केले.मराठी भाषा दिन व पुस्तक यांचा मैदानावर आकार काढण्याचे नियोजन व आरेखन कविता चव्हाण, प्रिया नांगरे,अंजली चौगुले, कृष्णराव टकले, अनिल गायकवाड, सुनील दळवी यांनी केले. मनोज तळपे,श्रीकांत अहिरे , पुनम घोडके, निकिता कांबळे, योगिता साळुंखे, अश्विनी दांगट, ओंकार गावडे, ऋषिकेश घोळवे ,भावेश खैरनार, विद्या आवाड यांनी मदत केली. निकिता गिरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.








