राजकीयशहर

प्रभाग २९ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना सोसायटीधारकांचा वाढता पाठिंबा


पिंपरी : प्रतिनिधी : पिंपळे गुरव परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना सोसायटीधारकांचा वाढता आणि ठोस पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलमधील तानाजी जवळकर, राजू लोखंडे, सुनीता कोळप आणि कुंदा डोळस या चारही उमेदवारांचे विविध गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आणि जल्लोषात स्वागत केले.

प्रचारादरम्यान नागरिकांनी उमेदवारांशी थेट संवाद साधत परिसरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, वाहतूक, तसेच मूलभूत सुविधांबाबतच्या अपेक्षा मांडल्या. उमेदवारांनीही स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत सर्वसमावेशक विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.

सोसायटीधारकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद आणि वाढता सहभाग पाहता, पिंपळे गुरवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे. नागरिकांच्या विश्वासावर आणि सहभागावर आधारित ही निवडणूक असल्याची भावना उमेदवारांनी यावेळी व्यक्त केली.

अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर जनतेचा ठाम विश्वास

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवर जनतेचा ठाम आणि दृढ विश्वास आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासात अजितदादांचे योगदान निर्णायक आणि दिशादर्शक ठरले असून, शहराच्या पायाभूत सुविधांचा भक्कम पाया त्यांच्या नेतृत्वाखाली घातला गेला, हे सर्वश्रुत आहे.

 

रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, उद्योग आणि सार्वजनिक सुविधा या प्रत्येक क्षेत्रात झालेला विकास हा अजित पवारांच्या दूरदृष्टीचा आणि प्रभावी निर्णयक्षमतेचा परिणाम मानला जातो. त्यामुळेच आजही पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा उल्लेख होताच अजितदादांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.

स्पष्ट भूमिका, कठोर निर्णय आणि विकासाभिमुख कार्यपद्धती यामुळे अजित पवार हे केवळ नेते नसून विकासाचे प्रतीक बनले आहेत, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *